कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली अनेक महिन्यांपासून शालेय शिक्षण विभागावर याचा मोठा परिणाम झाला आहे. मात्र आता हळहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे,
तसेच शासनाकडून नियमांमध्ये शिथिलता देण्यात येत असल्याने शाळा पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या एकूण 6 हजार 327 शाळा असून, त्यात 8 लाख 91 हजार 505 विद्यार्थी संख्या आहे. करोना प्रभाव कमी झाल्याने आता जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा भरविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

यामुळे जिल्ह्यातील शाळांची घंटा गुरुवार (दि. 11) पासून पुन्हा वाजणार आहे. यात पाचवी ते बारावीचे वर्ग आधीच सुरू झाले होते. परंतु पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग करोनामुळे सुमारे दोन वर्षांनंतर भरणार आहेत.
करोना स्थितीमुळे पहिल्या व दुसर्या लाटेत गेल्या दीड-पावणेदोन वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद होती. दरम्यान, राज्य सरकारने पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हा प्रशासनावर सोपविला असून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने याबाबत परवागीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागीतलेली आहे.