अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- जो पर्यंत ओबीसी आरक्षण राज्यात लागू होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक घेऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे बाबासाहेब सानप यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे करुन ओबीसीच आरक्षण पुन्हा लागू करा, असे साकडे घातले.
नगर जिल्हा ट्रक असोसिएशनचे प्रमुख बाबासाहेब सानप यांनी नवीदिल्लीत महाराष्ट्र सदनात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. राज्यपाल श्री.कोशारी यांच्या एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने निमंत्रित म्हणून श्री.सानप महाराष्ट्र सदनात उपस्थित होते. यावेळी त्यांनी वाहतुकदारांचे प्रश्न मांडतांना ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवरही राज्यपाल श्री.कोशारी यांच्याशी चर्चा केली.
ओबीसीचे राजकीय आरक्षण लागू करुन या निवडणुका घेतल्यास वंचित समाजाला न्याय मिळेल, असे सांगून त्यांनी इतर मागासवर्गीयांना आरक्षणाची गरज आहे, याची जाणिव करुन दिली. लोक जागृतीमुळे अलिकडे वंचित ओबीसी समाज आरक्षणाचा लाभ घेण्यास सुरुवात झाली असतांना हे आरक्षण काढून घेण्यात आले.
ओबीसी समाजात अनेक छोटे-छोटे समाज आहेत, त्यांना मूळ प्रवाहात येण्यास या आरक्षणाचा उपयोग होणार आहे, म्हणून ओबीसी आरक्षणाचा हक्क अबाधित रहावा, अशी अपेक्षा बाबासाहेब सानप यांनी व्यक्त केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम