टाळेबंदीत अनाधिकृत मोबाईल टॉवरचे काम प्रगतीपथावर स्थानिक नागरिकांचा विरोध !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  शहरात विनापरवाना मोबाईल टॉवरकडे मनपा प्रशासन डोळेझाक करत असतना, टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन अरणगाव रोड, महापालिका हद्दीतील इंदिरानगर भागात अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

महापालिकेकडे सदर काम बंद करण्याची तक्रार करुन देखील महापालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याने दोनशे स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन चोभे मास्तर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.

निवासी जागेत बांधकामाचा परवाना असताना इंदिरानगर भागात अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारले जात आहे. टॉवरसाठी फाऊंडेशनचे काम करण्यात आले आहे. मोबाईल कंपनीकडून टॉवरच्या मोबदल्यात महिन्याला चांगले पैसे मिळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याची पर्वा न करता हे टॉवर उभारले जात आहे.

लोकवस्तीत मोबाईल टॉवरच्या शंभर मीटर अंतरावर राहणार्‍या नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार आहे. कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता टाळेबंदीत सदर काम केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्थानिक नागरिकांनी आरोग्यावर दुष्परिणाम होण्याच्या भितीने या कामास विरोध दर्शविला आहे. सदर अनाधिकृत मोबाईल टॉवरचे काम बंद न केल्यास शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर दि.23 मे रोजी उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe