महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. डिसेंबरनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सरकारने नवे नियम जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सुमारे 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे

शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता सरकार अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. संध्याकाळी 6 नंतर पहाटेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीनुसार तिथल्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावे, असे निर्देश सरकारने दिल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.सुरक्षेच्या दृष्टीने लोकांनी काळजी घेतली नाही तर लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन ?
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे नियम पाळण्यापासून ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंगपर्यंतच्या अनेक उपाययोजनांची अमलबजावणी करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर अनेक जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून काही ठिकाणी हॉटेल्स, पब, रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ
राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दररोज मोठ्याप्रमाणावर करोनाबाधित वाढत असुन, करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. मागील २४ तासांध्ये राज्यभरात ६ हजार ११२ नवे करोनाबाधित वाढले असुन, ४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ८७ हजार ६३२ वर पोहचली आहे.

याशिवाय मागील २४ तासांमध्ये राज्यात २ हजार १५९ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. आजपर्यंत राज्यात १९ लाख ८९ हजार ९६३ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५. ३२ टक्के एवढे झाले आहे.

कोरोनामुळे आषाढी वारीनंतर आता माघी वारीही रद्द
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आता आषाढवारीनंतर पंढरपूरची माघीवारीही रद्द करण्यात आलं आहे. कोरोनामुळे पंढरपूर शहरासह 10 गावांमध्ये संचारबंदी देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनामुळे आषाढी वारीनंतर आता माघी वारीही रद्द करण्यात आलीये. पंढरपूर शहरासह शेजारच्या दहा गावांमध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आलेत. 22 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून 23 फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबादचे आदेश काढले आहेत.

शरद पवारांनी ट्वीट करून सांगितलं सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व !
कोरोनाचा विळखा रोखायचा असेल तर मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासह इतर महत्त्वाच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील सोशल मीडियावर असाच एक संदेश सामान्यांना दिला आहे.

मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये त्यांनी हे ट्वीट केलं आहे. यात शरद पवारांनी असं म्हटलं आहे की, ‘सोशल डिस्टन्सिंगची ताकद, योग्य काळजी हाच उपाय’. असं कॅप्शन देत शरद पवारांनी एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत नमुद करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe