Long Hair Tips : इतरांप्रमाणे लांब, घनदाट आणि मुलायम केस हवेत? तर मग करा ‘या’ 3 गोष्टी

Long Hair Tips : आपले केस लांब (Long hair), काळे, घनदाट (Dense) आणि मुलायम (Soft) असावेत अशी प्रत्येकाची ईच्छा असते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या केसावर प्रेम करतो. परंतु आपण कळत नकळत अशा काही चुका करतो त्यामुळे केस खराब (Hair damage) होतात.

लांबसडक केस हे आपला लुक भन्नाट करतात. तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुमचे केससुद्धा कंबरेपर्यंत लांब व्हावेत आणि त्यासाठी तुम्ही अनेक उपायसुद्धा ट्राय करून पाहिले असतील. परंतु तरीही काही जणांचे केस लांब काळे घनदाट आणि मुलायम होत नसतील.

मसालेदार अन्नापासून अंतर ठेवा

मसालेदार अन्न (Spicy food) आरोग्यासाठी चांगले नाही हे सर्वांनाच माहीत आहे. यामुळे तुमच्या केसांची वाढही थांबू शकते. जर तुम्ही जेवणात किंवा पेयामध्ये तेलकट मसाल्याच्या गोष्टी जास्त वापरत असाल किंवा जंक फूड (Junk food) जास्त खाल्ले तर त्यापासून अंतर ठेवा.

जास्त पाणी प्या

कधीकधी पाण्याच्या कमतरतेमुळे केसांची वाढही थांबते. अशा परिस्थितीत तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका,अन्यथा तुमचे केस लांब वाढवण्याची तुमची इच्छा अपूर्ण राहू शकते.

तेलाने मसाज करा

केसांना भरपूर पोषण आवश्यक असते. म्हणजेच आठवड्यातून तीनदा केसांना मसाज करा, त्याचा फायदा होईल. यामुळे तुमच्या केसांची वाढ थांबणार नाही, उलट तुमचे केस सहज वाढू लागतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe