अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-आता पर्यंत आपण चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून, थेट मशीनच उचलून नेल्याच्या घटना घडल्याच्या ऐकल्या आहेत.
पण एका आधुनिक बंटी बबलीने तर कहरच केला आहे. तो असा त्यांनी एटीएम मशीनच हॅक करुन १ हजार रुपयांच्या ५० ट्रांझेक्शनद्वारे तब्बल १० लाख रुपये काढून बँकेला चुना लावल्याचे समोर आले आहे.

अशाच प्रकारे त्यांनी शिवाजीनगर येथील एका बँकेच्याच एका एटीएम सेंटरमधून ५ लाख रुपये काढले होते. तसेच विमाननगर व धायरी येथील एटीएममधून त्यांनी काही हजार रुपये लंपास केले आहेत.
आतापर्यंत चोरट्यांकडून एटीएम मशीन बंद करुन पैसे काढण्याचा एक प्रकार यापूर्वी वापरला जात होता. मात्र आता तर चक्क एटीएम मशीन हॅक केल्याचा प्रकार समोर येत आहे.
त्याचा तपास करायचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून त्याचसोबत बँकांनाही आपल्या तांत्रिक बाजू आणखी भक्कम कराव्या लागणार आहेत. दरम्यान या आधुनिक बंटी बबलीच्या मागावर पोलिस असून ते अत्यंत सखोल माहिती जमा करत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













