देशात लम्पीने ८२ हजार जनावरे दगावली, महाराष्ट्रात…

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News:माणसांमधील कोरोनानंतर जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचे संकट कठीण होत आहे. अलीकडेच या व्हायरसनेही आपले स्वरूप बदलेले असून तो जलद पसरणारा आणि घातक होत असल्याचे निरीक्षत्रण नोंदविण्यात आले आहे.

आतापर्यंत देशभरात या रोगामुळे ८२ हजार जनावरे दगावली आहेत. महारष्ट्रात या रोगामुळे १२६ जनावरांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ४७ मृत्यू जळगाव जिल्ह्यात झाले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात २६ मृत्यू झाले अशून शेकडो जनावरांना याची बाधा झाली आहे. पशुसंवर्धन विभागाने आता रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पाळीव गोवंशीय जनावरांना होणारा हा रोग असला तरी आता तो जंगलातील प्राण्यांमध्येही पसरण्याचा धोका व्यक्त होत आहे.

त्यामुळे वनविभागानेही आता दक्षता घ्यायला सुरवात केली आहे, कोरोनाच्या व्हायरसचे जसे म्युटेशन होत होते, तसेच या लम्पी रोगाच्या व्हायरसचेही होत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe