अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- मी आमदार असतो तर ५० टक्के जिव वाचविले असते अशा वल्गना करणाऱ्या मा. आ. विजय औटी यांनी स्वतःच्या पतसंस्थेतील कर्मचाऱ्याला वेळेवर मदत केली असती तर त्याचा जिव वाचू शकला असता.
त्यांच्या कुटूंबियांचे फोनही न घेणाऱ्या मा.आ. औटी यांनी कोरोना काळात समाजासाठी काय योगदान दिले ? हे एकदाचे सांगावे असे आव्हान टाकळीढोकेश्वरच्या सरपंच अरूणा बाळासाहेब खिलारी व हिवरे कोरडाच्या सरपंच उज्वला दत्ता कोरडे यांनी दिले आहे.
औटी यांच्या पतस्थेतील कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना त्यांच्याच बगलबच्चाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पुढे त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मदतीची आवष्यकता होती.
संकटात सापडलेले त्यांचे कुटूंबिय माजी आमदारांना फोन करीत होते. परंतू त्यांचे फोन स्विकारले गेले नाही. त्यांच्या कुटूंबियांनी आमदार नीलेश लंके यांना फोन केल्यानंतर आ. लंके यांनी राजकिय हेवादावा न पाहता
कर्मचाऱ्यासाठी तात्काळ नगर येथे उपचाराची व्यवस्था केली. त्यांच्या उपचारावर लक्ष ठेवले. त्या कर्मचाऱ्यास माजी आमदारांनी वेळीच मदत केली असती तर कदाचित त्यांचा जिव वाचू शकला असता.
मात्र मदत तर सोडा फोनही न घेतल्याने त्यांना कर्मचाऱ्यांविषयी किती अस्था आहे याचा अनुभव आला. त्याच कर्मचाऱ्याने आपल्या सर्व निवडणूकांमध्ये स्वतःच्या खिशातून खर्च करून तुमच्यासाठी जिवाचे रान केले.
किमान ती सहानुभूती तरी त्याच्या जिवनमरणाप्रसंगी दाखवायला हवी होती. रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी आमदारच असावे असा कोठे नियम आहे का ? ज्यांनी कोरोना रूग्णांना मदत केली त्या सर्वांना शासनाने मदत केली.
पहिल्या लाटेत तुम्ही एक कोव्हिड सेंटर देखाव्यापुरते सुरू केले. त्यानंतर त्याकडे ढूंकूणही पाहिले नाही. केवळ देखाव्यापुरते नव्हे तर स्वतःचा जिव धोक्यात घालून तरच त्याची समाजाकडून दखल घेतली जाते. समाजाला भाषणबाजीवर भुलविण्याचे दिवस आता गेले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम