‘मागेल त्याला शेततळे’ योजना बंद !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- टरबॅंक म्हणून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना शासनाने गुंडाळली आहे.

मागील एक वर्षापासून या योजनेला ब्रेक लागला आहे. याबाबतचे पत्र कृषी विभागाला प्राप्त झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून, ही योजना वाढीव अनुदानासह प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी पाथर्डी तालुक्­यातील पाडळी,

चितळी, साकेगाव, पागोरी पिंपळगाव, हत्राळ, कासार पिंपळगाव परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

राज्याच्या कृषी विभागामार्फत ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबविण्यात येत होती. मात्र, मागील एक वर्षापासून या योजनेला शासनाने ब्रेक लावला आहे.

नवीन वर्षात कोणतेही नवीन शेततळ्याचे काम करू नये व नवीन शेततळ्याची आखणी करू देऊ नये,

अशा आदेशाचे पत्र कृषी विभागाला प्राप्त झाल्याची माहिती तालुका कृषी विभागाकडून मिळाली आहे.

या योजनेचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. मात्र, आता शासनानेच या योजनेला ब्रेक लावल्याने शेतकरी नाराज आहेत.

या योजनेंतर्गत ३० बाय ३०, २५ बाय २५, २० बाय २५ चौरस मीटरच्या शेततळ्याकरिता ५० हजार रुपये अनुदान, तर १५ बाय १५ व २० बाय १५ या शेततळ्याकरिता १६ हजारांचे अनुदान देण्यात येते.

मात्र, मागील काही वर्षांपासून या अनुदानात वाढ केली नसल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली होती.

या योजनेतून शेततळे तयार करण्याकरिता जवळचे पैसे टाकावे लागत असल्याने तसेच पेट्रोल, डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढल्याने ही योजना शेतकऱ्यांना परवडणारी नव्हती.

त्यातच शासनाने ही योजना बंद केल्यामुळे आता शासनाने सदर योजनेच्या अनुदानात वाढ करून पुन्हा नव्याने प्रभावीपणे ती राबविण्याची मागणी तालुक्­यातील शेतकरी करीत आहेत.

दरम्यान, एक शेततळे तयार करायला अनुदानाच्या दीडपट खर्च येतो. त्यामुळे जवळचे पैसे टाकावे लागत होते. या योजनेचा फायदा शेतकरी घेऊ शकत नव्हते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|