अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या अहमदनगर विभागीय अध्यक्षपदी कमलेश मोगल गायकवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली. महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या अहमदनगर विभागीय कार्यकारिणीची बैठक नेवासा येथे नुकतीच संपन्न झाली.
या बैठकित नूतन विभागीय कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. अहमदनगर विभागीय अध्यक्षपदी कमलेश गायकवाड, सचिव विष्णु घुले, संघटक सचिव अंबादास गोयेकर, कार्याध्यक्ष अनिरुद्ध चव्हाण, ब्रह्मदेव जायभाये, विभागीय उपाध्यक्ष प्रवीण तिरोडकर, सॅम्युएल साठे, खजिनदार विजय गवळी,
लतीफभाई शेख, प्रसिद्धी प्रमुख डॅनियल कोल्हे, अण्णासाहेब थोरे, कार्यकारिणी सदस्य अशोक दाणे, शंकर सोनवणे, धनापुणे, गणेश पाठक, कुसळकर, वाघमारे, गजानन बुधवंत, शिवाजी भालेकर यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र एस.टी. काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष तथा मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी नूतन विभागीय अध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्यासह सर्व नूतन पदाधिकार्यांचे दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले.
नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. एस.टी. कर्मचार्यांना न्याय देणार – यापूर्वी संघटनेने नेवासा आगार अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. त्या माध्यमातून एस.टी. कर्मचार्यांचे प्रश्न पोटतिडकीने सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
या कामाची पावती म्हणून वरिष्ठांनी विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. विभागीय पातळीवरील एस.टी. कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध राहणार आहे. -कमलेश गायकवाड (नूतन विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी. काँग्रेस)
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम