MahaRERA QR Code : महाराष्ट्रातील बिल्डरांना 50 हजारांपर्यंत दंड !

Sonali Shelar
Published:
MahaRERA QR Code

MahaRERA QR Code : गृहनिर्माण प्रकल्पांच्या सर्व जाहिरातीबाबत आता महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्या बाजूला ठळकपणे क्यूआर कोड दाखवणे बंधनकारक आहे. असे न करणाऱ्या बिल्डराना ५० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे.

क्यूआर कोड छापणे बंधनकारक झाल्याने प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्प कधी नोंदवला गेला, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का, विविध मंजुच्या मंजूर आराखड्यात काही बदल केला का?. प्रकल्पाच्या नोंदणीचे नूतनीकरण केले का?, असा सर्व तपशील या क्यूआर कोडमुळे एका क्लिकवर सहजपणे उपलब्ध होणार आहे

विकासक आपल्या गृहनिर्माण प्रकल्पांत जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे इन्स्टाग्राम, द्विटर, व्हॉट्सअॅपवर प्रकल्पाच्या जाहिराती करतात. या जाहिरातीमध्ये महारेरा क्रमांक आणि महारेरा संकेतस्थळ छापणे बंधनकारक आहेच

गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व जाहिरातींसोबत क्यूआर कोड छापणे बंधनकारक असल्याचे महारेराने मेमध्ये जाहीर केले आहे. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या विकासकांवर ५० हजारापर्यंत दंड ठोठावला जाईल.या निर्णयामुळे आता १ ऑगस्टपासून क्यूआर कोडही ठळकपणे दर्शवणे, छापणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe