पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- शाश्वत शेती विकास, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, शेतमालास रास्त दर, महागाई आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण अशी अनेक आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून एकाही आश्वासनांची पूर्तता झाली नाही.

त्यातच यावर्षी पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्याने शेती आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सरकारने दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी देण्याबरोबरच वीज बिलांत सूट द्यावी, अशी मागणी जि. प. सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली.

राज्यातील काही भागात महापूरसदृश्य परिस्थिती ओढावली. नाशिक, नगर, औरंगाबाद या जिल्ह्यात दीड महिन्यापासून पाऊसच नाही. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे भरपाई देणे गरजेचे आहे, असे परजणे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe