राज्‍यात महाविकास आघाडी सरकारकडुन फक्‍त समान लुटीचा कार्यक्रम सुरु !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-  मनसुख हिरन यांच्या मृत्यूबाबत एटीसच्या अहवालातून ब-याच गोष्टी समोर आल्‍या आहेत. त्‍यामुळे सचिन वाझेंची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची आणि राज्यातील जनतेची दिशाभूल केल्‍याचे उघड झाल्‍याने मुख्‍यमंत्री त्‍याचे प्रायचित्‍त भोगणार का? असा सवाल भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला.

संपुर्ण महाराष्‍ट्राला जबाबदारीची जाणीव करुन देणा-या मुख्‍यमंत्र्यांनी आता आपल्‍या अति शहाण्या सल्लागाराचा सल्ला ऐकून तरी आता चुप्पी सोडण्‍याची जबाबदारी पार पाडावी अशी मागणी केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमरवीससिंह यांनी गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपानंतर राज्यात निर्माण झालेल्या संशयकल्लोळावर आ.विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

परमवीरसिंह यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. त्यांनी पत्राव्‍दारे गृहमंत्र्यांवर केलेल्‍या थेट आरोपांबाबत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना संशय वाटत असेल तर, सेवाशर्थीचा भंग केल्याबद्दल त्यांना सरकार निलंबीत का करत नाही याकडेही आ.विखे पाटील यांनी माध्‍यमांचे लक्ष वेधले. मुंबईत घडलेल्‍या गंभिर घटनेतून गृहखात्‍याबाबत निर्माण झालेल्‍या प्रश्‍नांबाबत सरकार अद्यापही गांभिर्य दाखवायला तयार नाही.

या घटनेमुळे सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही या असे सांगून महाविकास आघाडीचे नेते हात वर करत असतील तर, संशयाचे भूत मुख्‍यमंत्र्यांपर्यंत पोहचल्‍याशिवाय राहणार नाही याची जाणीव ठेवावी असा सुचक इशारा देवून, आ.विखे पाटील म्‍हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मार्फत झाली पाहीजे, यासाठी गृहमंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेण्‍याची गजर त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

हे प्रकरण केवळ गृहमंत्र्यापुरते मर्यादीत नाही, राज्‍यात महाविकास आघाडी सरकारकडुन फक्‍त समान लुटीचा कार्यक्रम सुरु असून, सरकारमध्‍ये भ्रष्‍टाचाराची मालिका सुरु असल्‍याची टिका करुन आ.विखे पाटील म्‍हणाले की, एवढ्या गंभिर घटनेची वस्‍तुस्थिती मुख्‍यमंत्र्यानी समोर आणण्‍यासाठी आपल्‍या अतिशाहाण्‍या सल्‍लागाराचा तरी सल्‍ला ऐकण्‍याचे सुचक भाष्‍य केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe