लाच प्रकरणी ‘महिला तलाठी’ एसीबीच्या जाळ्यात!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- शेतजमीनीचे वाटणी पत्र व हक्क सोडपत्रा आधारे नोंदी घेऊन फेरफार देणे करिता ६ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगरमधील पथकाने ही कारवाई केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे खडकेवाके हद्दीतील वडिलांचे व चुलत्यांचे नावे असलेल्या शेतजमीनीचे वाटणी पत्र व हक्क सोडपत्रा आधारे नोंदी घेऊन फेरफार देणे करिता ६ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगरमधील पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपी स्वाती गौतम मेश्राम, (वय ३७ वर्ष, तलाठी, सजा केलवड,वर्ग ३, ता. राहता, जि. अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांनी त्यांचे खडकेवाके हद्दीतील वडिलांचे व चुलत्यांचे नावे असलेल्या शेतजमीनीचे वाटणी पत्र व हक्क सोड पत्रा आधारे नोंदी घेऊन फेरफार देणे करिता यातील आरोपी लोकसेविका यांनी तक्रारदार यांचे कडे ७०००रुपयांची मागणी केली.

मात्र तक्रारदारास त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी याबाबत नगर येथील लाचलुचपत विभागात दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपीने पंचासमक्ष ७००० रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती ६०००रुपये लाचेची मागणी केली.

सदरची रक्कम आज तक्रारदार यांचे कडुन पंचा समक्ष, केलवड तलाठी कार्यालय, ता. राहता येथे स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe