शहर बँकेच्या बोगस कर्जप्रकरणातील तिसर्‍या गुन्ह्यात मालपाणीला अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- शहर बँकेच्या बोगस कर्जप्रकरणातील आरोपी योगेश मालपाणी यांच्या अडचणीत भर पडली आहे.

मालपाणीला आर्थिक गुन्हे शाखेकडून पाहिल्या नंतर दुसर्‍या आणि आज त्याला तिसरा गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेण्यात आले.

डाॅ. नीलेश शेळके संचलित एम्स हाॅस्पिटलमधील मशिनरी खरेदीसाठी अहमदनगर शहर सहकारी बँकेने १७ कोटी २५ लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप केल्याने डॉ. शेळके याच्यासह बँकेचे संचालक मंडळ अशा २५ जणांविरुद्ध फसवणुकीचे तीन गुन्हे कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

या मशिनरींचा पुरवठा याेगेश मालपाणी याच्यामार्फत झाला असल्याचे तपासात पुढे आले होते. याप्रकरणी योगेश मालपाणीला 16 जूनला जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती.

पहिल्या आणि दुसर्‍या गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडी झाल्यानंतर आज तिसर्‍या गुन्ह्यात योगेश मालपाणीला न्यायालयाने त्याला 25 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान शहर सहकारी बँकेच्या बोगस कर्जप्रकरणी गुन्ह्याचा तपास अद्याप सुरूच आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe