अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोल्हार बुद्रुक येथील बाळासाहेब यशवंत लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा लोणी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली आहे. पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे की, बाळासाहेब यशवंत लोखंडेने आपल्याकडे
पाहून अश्लिल हातवारे करीत वाईट नजरेतून व अश्लिल भाषेत बोलून शिवीगाळ करीत विनयभंग केला. यासंदर्भात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम