रस्त्यांवरील मोकाट जनावरे पकडण्यासाठी मनपाने नियुक्त केली खासगी संस्था

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  अनेकदा रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीला जबाबदार असणारे मोकाट जनावरांच्या विरुद्ध आता मनपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे हे जनावरे पकडण्याचे काम महापालिकेने खासगी संस्थेकडे सोपवले असून या संस्थेने मंगळवारी मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू केली आहे.

शहरात 400 ते 700 मोकाट जनावरांची भटकंती सुरू आहे. ही जनावरे चौकाचौकांत रस्त्यावर फिरत असताना दिसतात. या जनावारांमुळे वाहतुकीला अडथळा तर होतोच त्याचबरोबर वाहतूक कोंडी आणि अपघात या घटनाही घडत आहेत. रस्त्यावर उभी राहणारी ही मोकाट जनावरे नागरिकांचा पाठलाही करतात त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये या जनावरांची भीती निर्माण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात मोकाट जनावरे पकडण्याचे काम निविदा पद्धतीने एका खासगी संस्थेकडे सोपवले आहे. या संस्थेच्या कामगार पथकाने मंगळवारपासून मोकाट जनावरे पकडण्यास सुरूवात केली आहे. या मोहिमेत आडकाठी आणणार्‍या लोकांवर गुन्हा नोंदवून थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

दरम्यान पकडण्यात आलेली सर्व जनावरे पिंपळगाव माळवी येथील महापालिकेच्या कोंडवाड्यात नेऊन सोडण्यात येणार आहेत. तसेच पकडलेली जनावरे मालकांच्या मागणीनंतर जागेवर सोडून मिळणार नाही.

त्यासाठी मालकाने पिंपळगाव माळवी येथील मनपाचे कोंडवाड्यावर जाऊन रितसर दंड भरून सोडून आणावी लागणार आहेत. या कारवाईनंतर जनावरे मोकाट सोडल्यास संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe