तहसीलदारांच्या समर्थनार्थ मनसैनिक उतरले मैदानात; जिल्हाधिकऱ्यांची भेट घेत केली महत्वाची मागणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा दिलेली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली.

या क्लिप मध्ये पारनेर चे लोकप्रतिनिधी कशा प्रकारे अधिकाऱ्यांना त्रास देतात याचे कथन देवरे यांनी केले होते. देवरे यांनी सर्वाना ह्दरावून सोडले आहे. देवरे यांनी अशा प्रकारे लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करू नये.

मनसे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा प्रस्ताव देत, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. आणि या ऑडिओ क्लिप ची चौकशी करा आणि दोषी लोकप्रतिनिधींवर कारवाई करा, अशी मागणी या निवेदनात केली. तसेच लोकप्रतिनिधींच्या त्रास सहन होत नाही त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

आत्महत्येचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यात एक महिला तहसीलदार अधिकारी सुरक्षित नसेल तर पारनेरचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही व लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाने अनेक पारनेर तालुक्यातील खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार झालेले आहेत.

त्यामुळे एक महिला अधिकारी तहसीलदार अशाप्रकारे आत्महत्येचा इशारा देत असेल तर यापेक्षा गांभीर्य परिस्थिती अजून तालुक्यात काय असू शकते.

त्यामुळे ज्योती देवरे यांचा जबाब नोंदवून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत जेणेकरून पारनेर तालुक्यात भयमुक्त वातावरण होईल. मनसे तुमच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे, असा विश्वास मनसेच्या पदाधिकाकाऱ्यांनी देवरे यांना दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News