Mansoon Update: पाऊस आला रे….! तयारीला लागा वरुणराजा येतोय, ‘या’ दिवशी बरसणार मान्सूनचा पहिला पाऊस

Ajay Patil
Published:

Maharashtra Mansoon Update: महाराष्ट्रातील (Maharashtra) जनता गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची (Mansoon 2022) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे.

शेतकरी बांधवानी देखील शेतीची पूर्वमशागत (Pre Cultivation) उरकवून घेतली आहे आणि आता मान्सूनची (Mansoon Rain) अगदी चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत आहेत.

दरम्यान वेळे आधी केरळ मध्ये दाखल झालेला मान्सून यावर्षी पोषक वातावरण नसल्याने महाराष्ट्रात उशिरा दाखल होणार आहे. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार मान्सून हा सामान्य गतीने पुढे जात आहे आणि येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्राच्या तळकोकणात म्हणजेच दक्षिण कोकणात पोहोचण्याची शक्यता आहे.

याशिवाय, हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सांगितले की, 10 आणि 11 जून रोजी अरुणाचल प्रदेशात आणि पुढील पाच दिवस आसाम आणि मेघालयमध्ये (Heavy Rain) मुसळधार पावसाचा (204.4 मिमी पेक्षा जास्त) इशारा दिला आहे.

विशेष म्हणजे, देशातील वार्षिक पावसापैकी 70 टक्के पाऊस हा मान्सून वाऱ्यांमुळे येतो आणि तो कृषी-आधारित अर्थव्यवस्थेसाठी जीवनरेखा मानला जातो.

आयएमडीचे शास्त्रज्ञ आर. के. जेनामनी म्हणाले की, मान्सून 29 मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल झाला आणि 31 मे ते 7 जून दरम्यान दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भागात पोहोचला आहे.

दोन दिवसांत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहेजेनामनी यांनी पत्रकारांना सांगितले की, यंदा मान्सूनला उशीर झालेला नाही. येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे.

म्हणजेच येत्या दोन दिवसात मान्सून हा दक्षिण कोकण गाठणार असून त्यापुढील दोन दिवसांत मान्सून हा मुंबईत दस्तक देणार आहे.

जेनामनी म्हणाले की, येत्या दोन दिवसांत गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती आता अनुकूल बनली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असेल आणि गेल्या 50 वर्षांच्या सरासरी 87 सेंटीमीटरच्या तुलनेत 103 टक्के पाऊस पडेल.

निश्चितचं हवामान विभागाच्या या सुधारित अंदाजामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या असून शेतकरी बांधव पुन्हा एकदा जोमात कामाला लागला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe