Maratha Reservation :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आता हे आंदोलन तीव्र होऊ लागले आहे. दरम्यान आता हे आंदोलन वेगळ्याच वळणावर चालले की काय असे वाटू लागले आहे. त्याचे कारण म्हणजे समोर आलेली एक धक्कादायक बातमी.
मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांनी टिपण्णी केली होती. याचा परिणाम असा झाला की, हजारो नागरिकांचा मॉब त्यांच्या बंगल्यात घुसला. त्यांच्या वाहनांवर दगडफेक करत जाळपोळ केली आहे.
बंगल्याचीही तोडफोड करण्यात आलेली आहे. ही घटना आज सोमवारी (ता. ३०) घडलेली आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी त्यांच्या घरातील दुमजली बांधकाम व वाहने पेटवून दिली. त्यानंतर घरालाच आग लागली. आंदोलकांनी हा हल्ला केला त्यावेळी सोळंके आणि त्यांचे कुटुंबीय घरातच असल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने यात त्यांच्या कुटुंबियांना दुखापत झालेली नाही.
नेमकं घटना का व काय घडली ?
माजलगाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल विचित्र वक्तव्याची कथीत ऑडीओ क्लीप समोर अली होती आणि त्यावरूनच मराठा आंदोलक आक्रमक झाले.
आज सकाळी त्यांच्या माजलगावच्या बंगल्यासमोर हजारो लोक जमले. लोकांनी बंगल्यावर दगडफेक केली. त्यानंतर आंदोलकांनी गेट उघडून आतमध्ये प्रवेश केला व चारचाकी वाहनांना आग लावली.
त्यांच्या बंगल्यालाही आग लावली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी तेथे अग्नीशमन वाहने आली. त्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे.
आंदोलकांनी त्यानंतर त्यांच्या नर्सिंग कॉलेजच्या इमारतीची देखील तोडफोड करून टाकली. आंदोलकांच्या ता दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांच्या वाहनांचीही नासधूस झाली. त्यामुळे आता बीडचं वातावरण तणावात्मक झाले आहे.