मराठा आरक्षण : अजित दादांच्या बैठकीत तरुणाची घोषणाबाजी…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि खरीप पेरणीसंदर्भात बीड जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती. ही बैठक सुरु असतानाच एका तरुणाने अजितदादांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भेट घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलिसांनी त्याला रोखले तेव्हा याच तरूणाने एक मराठा, लाख मराठा, अशी जोरदार घोषणाबाजी केली. हनुमान फफाळ असे या या तरुणाचे नाव आहे. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय धनंजय मुंडे व आमदार अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत अजित पवारांना भेटण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. पोलिसांनी हनुमान फाफाळ या तरुणाला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून बाहेर काढलं. त्यावेळी या तरुणाने घोषणाबाजीला सुरुवात केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा या तरुणाने दिल्या. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दुसरीकडे अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा प्रकार आज बीडमध्ये घडला.

जिल्हाधिकारी कार्यालयाती बैठक संपल्यानंतर अजित पवारांचा ताफा बाहेर पडत असताना कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ताफा अडवला. सरकारी नोकरीत समाविष्ट करुन घेण्याच्या मागणीसाठी हजारो कंत्राटी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळा झाले होते.

त्यात महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अजित पवारांना भेटू देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी भेट दिली गेली नाही.

बैठक संपल्यानंतर अजित पवार आणि राजेश टोपे यांचा ताफा निघाला असता तो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अडवला. तेव्हाही या कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेताच मंत्र्यांच्या गाड्या पुढे निघाल्या. त्यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. हा गोंधळ शांत करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe