अहमदनगर ब्रेकिंग अल्पवयीन मुलीला पळवून नेवून लग्न व बलात्कार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव तालुक्यातील एका १७ वर्ष वयाच्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या नववीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून आरोपी नवनाथ श्रावण शाखवय 23रा. डाऊच बु, ता. कोपरगाव याने तिच्या इच्छेविरुद्ध २३.५.१९ रोजी राहाता तालुक्‍यातील लोणी परिसरातील आहेर नावाच्या इसमाच्या वस्तीवर लग्न केले.

सदर अल्पवयीन विद्यार्थिनीवर आरोपीने वेळोवेळी अत्याचार केला. त्यातून १७ वर्षाची विद्यार्थिनी गर्भवती राहिली. या पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीला नाशिक जिल्ह्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या गंभीर प्रकरणी बालकल्याण समिती नाशिक यांनी कसुन चौकशी केल्याने हा गंभीर प्रकार उघड झाला. पोकॉ प्रकाश बबन कुंढरे नेमणूक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरुन

कोपरगाव शहर पोलिसात आरोपी नवनाथ श्रावण शाख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोनि गवळी यांनी भेट दिली. पोसईं नागरे हे आरोपी नवनाथचा कसून शोध घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe