चारचाकी वाहन घेण्यासाठी विवाहितेचा छळ, सासरच्या पाच जणांवर गुन्हा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :-  चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याची घटना जून २०१९ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान घडली. याबाबत सासरच्या पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

प्राजक्ता किरण कोळगे, चिंचविहिरे या विवाहितेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, जून २०१९ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान यातील आरोपी यांनी फिर्यादी प्राजक्ता किरण कोळगे हिचे लग्न झाल्यापासून ते ३० ऑक्टोबर २०१९ दरम्यान फिर्यादी प्राजक्ता कोळगे हिने

चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन येत नाही. या कारणावरून यातील आरोपींनी प्राजक्ता हिला वारंवार शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली.

तिचा मानसिक व शारीरिक छळ करून तीला उपाशीपोटी ठेवले. तुला नांदवणार नाही, असा दम देऊन तिला घराचे बाहेर हाकलून दिले.

प्राजक्ता कोळगे हिने राहुरी पोलिसात धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी किरण नानासाहेब कोळगे, नानासाहेब दामू कोळगे, आशाबाई नानासाहेब कोळगे, विशाल बबन कोळगे, बबन दामू कोळगे,

सर्व नांदुर्खी ता. राहता या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक विठ्ठल राठोड हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe