अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-चारित्र्याच्या संशयावरुन वारंवार सासरी होणाऱ्या छंळास कंटाळून संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी अजामपूर येथील विवाहित महिला शारदा जयराम गिते हिने गुरुवारी रात्री विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात मयत शारदा हिचे वडील दगडू सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विवाहितेचा पती जयराम चांगदेव गिते व भाया संतोष चांगदेव गिते यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, पती जयराम गिते व भाया संतोष गिते हे दोघे शारदा हिला चारित्र्याच्या संशयावरून वारंवार मारहाण करत होते. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०२० मध्ये महिलेने पतीविरोधात तक्रार दिली होती.
त्यानंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा नांदायला गेली होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने ती रुग्णालयात नोकरी करत होती; परंतु चारित्र्याचा संशय घेऊन तिला नोकरी सोडण्यास भाग पाडण्यात आले होते.
दोन दिवसांपूर्वी जावई व मुलगी दोघे ही हाजरवाडी येथे भेटायला आले होते. यावेळी माझे पाय दुखत असल्याने जावई जयराम यांनी मुलगी शारदा हिला माझ्या सोबत दवाखान्यात जाण्यासाठी सोडून गेले होते.
दुसऱ्या दिवशी दवाखान्यातुन आल्यानंतर शारदाला नवीन मोबाईल फोन विकत घेऊन दिला व तिला सासरी पिंप्री – लौकी येथे सोडले होते. हा फोन घेणे आरोपींनी पसंत पडले नाही. तीला मारहाण करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे गुरुवारी मध्यरात्री शारदाने विषारी औषध घेतले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|