मारुती सुझूकीची Eeco कार फक्त 2 लाख रुपयांत तुमच्या नावावर होणार ! वाचा डिटेल्स

Published on -

Maruti Suzuki Eeco Finance Plan : नवीन कार घेणार आहात ? मग आजची बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरेतर येत्या काही दिवसांनी दिवाळी येईल.

या काळात अनेकजण नवीन वाहन खरेदी करतात. आता तुमचाही येत्या दिवाळीत नवीन वाहन खरेदीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्वपूर्ण फायनान्स प्लॅन घेऊन आलो आहोत.

ज्या लोकांना मारुती सुझुकीची इको खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी आज आम्ही एक फायनान्स प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत. दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यास मारुती सुझुकीची इको खरेदी करण्यासाठी किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार ? हे या प्लॅन मधून आपल्याला समजून जाईल.

खरेतर Eeco ही एक लोकप्रिय वॅन आहे. पण अनेकजण ही गाडी फॅमिली युज साठी सुद्धा घेतात. ज्या लोकांचा परिवार मोठा आहे अशा लोकांसाठी ही गाडी फायद्याची ठरते.

या गाडीची किंमत ही मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये पण आहे. याच्या बेस व्हेरीयंटची एक्स शोरूम किंमत 5.21 लाख रुपये आहे. आता आपण या गाडीचा फायनान्स प्लॅन जाणून घेऊयात. दोन लाखाच्या डाऊन पेमेंटवर ही गाडी खरेदी करण्यासाठी कितीचा EMI बसेल हे समजून घेऊयात.

कितीचा हफ्ता भरावा लागणार?

पेट्रोल इंजिनचे बेस व्हेरिएंट खरेदी करायचे असल्यास बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज पुरवते. यामुळे 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून अंदाजे 3.73 लाखांचे कर्ज मिळू शकते.

बँका साधारणता नऊ टक्के व्याजदरात वाहन कर्ज उपलब्ध करून देतात. यानुसार जर तुम्ही 3.73 लाख रुपयांचे वाहन कर्ज सात वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला दर महिन्याला 6 हजार 12 रुपयांचा EMI भरावा लागू शकतो. म्हणजे तुम्हाला मारुती सुझुकीची इको खरेदी करण्यासाठी 1.31 लाख रुपयांचे व्याज द्यावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News