corona news:कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर तोंडावरून हटलेले मास्क पुन्हा येऊ पहात आहेत. रूगणांची संख्या वाढ असल्याने दिल्ली राज्यात मास्कसक्ती लागू केली आहे.
मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. इकडे महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे १६ हजार २९९ रुग्ण सापडले आहेत. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख २५ हजार ७६ झाली आहे.
पॉजिटिव्हीटी रेट ४.५८ टक्के झाला आहे. दिल्लीतील आकडेवारीही वाढतीच आहे. तेथे गेल्या २४ तासात २ हजार १४६ रुग्ण सापडले आहेत.
त्यातील आठ जणांचा मृत्यू झाला. लाट ओसरल्यानंतरची ही आकडेवारी सर्वाधिक आहे. त्यामुळे दिल्लीत मास्क सक्ती करण्यात आली आहे.
मास्क न घालणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. गाडीत एकत्र प्रवास करणाऱ्यांवर हा नियम लागू असणार नाही.
एकटा असेल तर मास्कची गरज नसेल. महाराष्ट्रात मुंबईत गेल्या २४ तासात ८५२ रुग्ण आढळले आहेत. १ जुलैनंतर एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.
मुंबईतील रुग्ण संख्या ७९ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे मुंबईतही यापुढे दक्षता घ्यावी लागणार आहे.