ऑक्सिजन’साठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली इतक्या कोटींची मदत !

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि मागील ७-८ दिवसांपासून दररोज साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे.

त्यामुळे आरोग्य यंत्रणाही कोलमडलेली पाहायला मिळत आहे. अशात अनेक दिग्गज मंडळींनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

ऑक्सिजनसाठी ‘Mission Oxygen’ ही मोहीम सुरू झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून देशांतील अनेक हॉस्पिटल्सना देणगी व ऑक्सिजन सिलेंडर दान केले जाणार आहेत.

महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानं ‘Mission Oxygen’ या उपकरर्मात सहभाग घेतला आहे आणि त्यानं स्वतः १ कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यानं इतरांनाही या चळवळीत हातभार लावण्याचं आवाहन केलं आहे.

तो म्हणाला, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण केला आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवणे ही सध्याच्या तासाची गरज बनली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe