स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने गोरगरिबांना दिली मायेची छत्री भेट अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा उपक्रम

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  नगर शहरातील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष उद्धव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरातील विविध भागात फिरून गोरगरीब रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्र्या भेट दिल्या.

अचानक मिळालेल्या या भेटीने गोरगरिब वंचित लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. नगर शहरात स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

सध्या पावसाळा सुरू असून रस्त्यावर राहणारे बेघर, निराधारांना दरवेळी पावसात कुडकुडत भिजण्याची वेळ येते. त्यांची ही समस्या लक्षात घेऊन स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी गरिबांना छत्री वाटपाचा निर्णय घेतला.

त्यानुसार स्नेहबंधचे उद्धव शिंदे यांच्यासह हेमंत डाकेफळकर, सचिन पेंडुरकर, संकेत शेलार यांनी नगर शहरातील लालटाकी, जिल्हा शासकीय रुग्णालय, झेंडीगेट, न्यू आर्ट्स महाविद्यालय, सावेडी रोड,

पाइपलाइन रोड व वाणीनगर परिसरात फिरून वंचित व गरीब गरजुंना पावसापासून बचावासाठी छत्र्यांचे वाटप केले. या अचानक मिळालेल्या मायेच्या छत्री भेटीने गरीबांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

यावेळी स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले, स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने नेहमी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यातून खऱ्या गरजुंना मदत मिळावी, हा हेतू आहे.

जे वंचित आहेत, गरीब आहेत अशांना आपल्या माध्यमातून काही तरी मदत मिळावी, या हेतूने पावसाळा सुरू असल्याने गरीबांना छत्री वाटपाचा निर्णय घेतला. यापुढेही स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील, असे शिंदे यांनी सांगितले.

यापूर्वी स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, दंत चिकित्सा शिबिर, गरिबांना ब्लँकेट वाटप, उन्हाच्या संरक्षणासाठी टोपी वाटप, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, मकर संक्रातीच्या वेळी गरीब मुलांना पतंगाचे वाटप,

कोरोना काळात शहरातील बुथ हॉस्पिटलला मदत, मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड वॉश वाटप व कोरोना योद्धे आरोग्य सेविका, नर्स, डॉक्टर्स यांचा सत्कार असे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe