मेरा भारत महान : भारतात तयार झालेल्या ‘या’ लसीत कोरोनाच्या ६१७ प्रकाराला निष्प्रभ करण्याची क्षमता!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-भारताने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या स्वदेशी लसीमध्ये कोरोनाच्या तब्बल ६१७ प्रकाराला निष्प्रभ करण्याची क्षमता असल्याचे आढळले आहे.

त्यामुळे भारतात अनेक अडचणी असतानाही कोरोनाच्या विरोधात ही लस अतिशय महत्त्वाचे रोगप्रतिबंधक औषध ठरू शकते, असे मत व्हाइट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी व्यक्त केले.

‘गार्डियन ऑस्ट्रेलिया’ या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाच्या सध्याच्या संकटाविरुद्ध लढण्यासाठी भारताला पुरेशी मदत करण्यात जगभरातील देश अपयशी ठरले आहेत.

अशा परिस्थितीत मदतीचा हात देण्याबाबत श्रीमंत देशांनी अधिक जबाबदारी स्वीकारायला हवी. जागतिक महासाथीला पुरेसा प्रतिसाद जगभरातून प्रतिसादाच्या मार्गानेच दिला जाऊ शकतो आणि जागतिक प्रतिसाद म्हणजे जगभरातून समन्यायी मदत होय.

दुर्दैवाने हे साध्य झालेले नाही. तुलनेने श्रीमंत असलेल्या किंवा अधिक उत्पन्न असलेल्या सर्व देशांना याबाबतीत अधिक लक्ष घालायला हवे, असे डॉ. फौची यांनी ‘गार्डियन ऑस्ट्रेलिया’ला सांगितले. भारतात सध्या करोना महासाथीने थैमान घातलेले आहे.

अशावेळी किमान १७ देश भारताला मदत करण्यासाठी पुढे आलेले आहेत आणि त्यात शेजारी देशांपासून जगातील महासत्तांचा समावेश आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe