अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरची वाहतूक करणाऱ्या दोघांसह ४ लाख २८ हजाराच्या मुद्देमाल कर्जत पोलिसांनी जप्त केला आहे.
खेड गावचे दिशेने एक स्विफ्ट कार येत असून त्यामध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर आहे आणि ती पावडर घरी जाऊन दुधात पाणी, पावडर व इतर साहित्य टाकून दुधात भेसळ करणार आहेत,
]अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान शिरसाठ ,पोलीस हवालदार महादेव गाडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे, गणेश भागडे ,महिला होमगार्ड कल्पना घोडके यांनी सांगून सदर ठिकाणी जाऊन तात्काळ कारवाई करा असे आदेशीत केल्याने वरील पोलीस स्टाफ तात्काळ पोलीस स्टेशन येथून खाजगी वाहनाने रवाना झाले.
]खेड गावचे शिवारात एक स्विफ्ट कार क्रमांक एमएच 14 बिके 2772 आली असताना त्यास पोलिसांनी थांबवून त्यातील इसमाकडे त्यांच्या नावाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे असिफ गफूर शेख, वय 22 वर्ष, अरबाज हसन शेख, वय 22 वर्ष (रा.मुसलमान वस्ती, दूरगाव, ता. कर्जत)असे असल्याचे सांगितले.
]पोलीस स्टाफने सदर वाहनाची झडती घेतली असता गाडीत दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडरच्या 25 किलो वजनाच्या 8 गोण्या व प्रत्येक गोणीची किंमत 3500 रुपये प्रमाणे 28,000 रु किमतीच्या असलेली दिसल्या.
]त्यावेळी पोलिसांनी वरील इसम यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही ही पावडर दुधात भेसळ करण्यासाठी आमचे दूरगाव गावी चाललो होतो. त्यावेळी पोलिसांची खात्री झाली की, सदरची पावडर ही दुधात भेसळ करण्यासाठी घेऊन जात होते असे कळवून त्यांचे घरी सदरबाबत कशी भेसळ केली जाते याबाबत प्रक्रिया करून दाखविली.
पोलिसांनी वरील दोन इसम यांना पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचे विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन अदखलपात्र गुन्हा रजिस्टर न 694/2021 भा द वि कलम 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून कोर्टाचे परवानगीने पुढील तपास पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते हे करीत आहेत. दूध पावडर आणि गाडी असा 4,28,000 रु चा माल जप्त करण्यात आला आहे
कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, सहायक फौजदार महादेव गाडे, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे, सुनील खैरे व महिला होमगार्ड कल्पना घोडके यांनी ही कारवाई केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम