अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- खासदार असुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाचे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल (एआयएमआयएम)अधिकृत ट्विटर खातं हॅक झाले आहे. हे एमआयएमचे ट्विटर हँडल हॅक करून हॅकर्सने एमआयएमच्य नावाऐवजी एलन मस्क यांचं नाव लििहलं आहे.
डीपीवर एलन मस्क यांचा फोटो लावला आहे. एलन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच स्पेक्सएक्स आणि टेस्लासारख्या कंपनीचे मालक आहेत.

खासदार ओवैसी यांच्या पक्षाने उत्तर प्रदेशात १०० जागा लढवण्याची घोषणा केली आहे. यासाठी पक्षाने सुहेलदेव भारतीय समाज पार्टीसोबत युती केली आहे.
त्याचबरोबर छोट्या पक्षांना सोबत घेण्यासाठी रणनिती आखली जात आहे. यानंतर ओवैसी विरोधकांच्या रडारवर आले आहेत. दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांना २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री बनू देणार नाही, असं ओवैसी यांनी सांगितलं आहे.
त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. “ओवैसी मोठे नेते आहेत. देशात प्रचार करतात. त्यांना एका समुदायाचा विशेष पाठिंबा आहे.
मात्र उत्तर प्रदेशात चॅलेंज नाही करू शकत. भाजपा आपले मुद्दे, मूल्यांसह मैदानात उतरणार आहे. मी चॅलेंज स्वीकारतो”, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम