अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- सध्या राज्यात आमदार निलेश लंके हे नाव चांगलेच गाजत आहे, सोशल मीडियावर लंके यांच्या कार्याचे कौतुक होताना दिसत आहे.
लंके यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये एक हजार बेड्सचं कोव्हिड केअर सेंटर सुरू केलं आहे. या ठिकाणी शंभर ऑक्सिजनच्या खाटा देखील आहेत. लंके हे स्वतः या कोव्हिड सेंटरमध्ये थांबून रुग्णांची काळजी घेत असल्याचे अनेक व्हीडिओ समोर आले आहेत.
सेंटरमध्ये रुग्णांसोबतच मुक्काम करून सेवा देत असलेल्या लंके यांच्या उपक्रमांना सर्वत्र प्रसिद्ध मिळत आहे. आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे सुरू केलेल्या शरदचंद्र पवार कोविड सेंटरसाठी तालुक्यातील जनतेबरोबरच देशविदेशातून तब्बल सव्वा कोटीं रूपयांची रोख मदत जमा झाली आहे
प्रत्येक रूग्णांसाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टिमर, नॅपकिन, पाणी बाॅटली, साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जात आहे. २४ तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी, वापरण्यासाठी गरम पाणी. सकस जेवण. दूध, अंडी, सूप आदींचा समावेश यामध्ये आहे.
पारनेरमधील या कोविड सेंटरला शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर हे नाव का दिलं, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर, लंकेंनी शरद पवार यांचं नाव देण्यामागील भावना आणि प्रेरणा बोलून दाखवली.जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा धावून कोण गेलं.
1993 साली किल्लारीला भूकंप झाला, तेव्हा धावून कोण गेलं.दोन वर्षांपूर्वी सांगली-कोल्हापूरला महापूर आला, तेव्हाही हा 80 वर्षांचा योद्धाच धावून गेला. म्हणजे, ज्यावेळेस संकट आलं तेव्हा शरद पवारच धावून गेले आहेत.
आपल्याला काटा टोचला तर आपण म्हणतो, आई sss गं.. आणि जर एखादा नाग दिसला तर आपण म्हणतो बाप रे…शरद पवार हे आपल्यासाठी वडिलांच्या जागी आहेत, महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा ते आधार देतात. म्हणूनच मी या कोविड सेंटरला शरद पवार यांचं नाव दिलं.
हे कोविड सेंटर नसून आरोग्य मंदिर आहे, अशा शब्दात आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांचे नाव देण्याचं कारण स्पष्ट केलं. दरम्यान लंके यांच्या कामाची किर्ती मिडियाच्या माध्यमातून सातासमुद्रापार गेली व त्यामुळे थेट देश विदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
कोकणवासीयांनाही आमदार लंके यांच्या कामाची भुरळ पडल्याने त्यांनी हापूस आंबे, तर मावळातून तांदूळ या रूग्णांसाठी पोहच केला आहे. या भेटीच्या मोबदल्यात कोकणवाशियांनी आमदार लंके यांना आमच्या कोकणात यावे लागेल,
अशी गळ घातली व लंके यांनी कोरोना महामारी कमी झाल्यावर कोकणात येण्याचेच नव्हे, तर थेट तेथे एक दिवस मुक्कम करण्याचेही मान्यही केले आहे.
आमदार लंके यांनी भाळवणी येथे सुरू केलेले शरदचंद्रजी पवार कोविड सेंटर मध्ये भजनाच्या कार्यक्रमात कोरोना रूग्ण भजनात तल्लीन होऊन नाचत असल्याचे पाहून आपण येथे गोकुळ उभे केले आहे.
लंके यांचे काम समाजाला आदर्श आहे. कोरोना रूग्णांच्यासेवेसाठी तेथेच कोविड सेंटरमध्ये झोपणाऱ्या आमदारांनी वेगळा असा राजकीय आदर्श निर्माण केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|