राज्यात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
त्यामुळे लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच राज्यामध्ये मंगळवारी 18,466 नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक 10,860, ठाणे 1354, पुणे 1113, नाशिक 308 आणि नागपूर 192 या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत.
त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी विशेष बैठक घेण्यात येणार आहे.
देशातील काही राज्यात कडक निर्बंध करण्यात आले असून, विंकइन्ड लॉकडाऊन करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, कर्नाटक, हरयाणा या राज्यात कडक निर्बंध करण्यात आले आहेत.
त्यामुळं महाराष्ट्रात सुद्धा कडक निर्बंध करण्यात येतील, तसेच राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जात आहे, तसेच राज्यात मिनी लॉकडाऊन होऊ शकतो असा निर्णय सुद्धा आजच्या उपमुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत होऊ शकतो. जर राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले तर कोणते निर्बंध असतील पाहूया.
हे निर्णय होऊ शकतात, या गोष्टी सुरु व बंद राहण्याची शक्यता
– रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत रात्रीची संचारबंदी, गर्दी केल्यास कलम 144 नुसार कारवाई होणार
– भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत, फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर नियम असतील
-पर्यटनस्थळावर जमावबंदी
– शाळा महाविद्यालये बंद
– थिएटर्स, मल्टिप्लेक्स, बँक्वेट हॉल, स्पा, जिम आणि मनोरंजन पार्क 50 टक्के क्षमतेने
-दुकाने सकाळी दहा ते रात्री 10 या वेळेत सुरु राहतील.
– मेट्रो आणि बसेस 50 टक्केंच्या क्षमतेने सुरु राहतील.
– रेस्टॉरंट्स, बार 50 टक्के क्षमतेने सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहतील.
– मॉल, बार, रेस्टॉरंट वेळात बदल करण्याचा निर्णय,तसेच ‘टेक अवे’ सर्व्हिस सुरु राहणार
– सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज केलं जाण्याची शक्यता
– राज्यातील सर्व उद्योग चालू ठेवण्याचा, उद्योग क्षेत्रातील कामगारांवर कुठलेही निर्बंध न ठेवण्याचा विचार आहे.
– सर्व बांधकामे सुरु राहण्याची शक्यता
– सरकारी ठेके असलेली कामेही सुरु राहणार
– शुटिंगवर गर्दी होणार नाही अशी ठिकाणी परवानगी दिली जाणार. राज्यातील चित्रपटगृहे 50 टक्के परवानगीने
– सर्व वाहतूक व्यवस्था सुरु राहणार. मात्र प्रवास करताना मास्क बंधनकारक
– 50 टक्के क्षमतेने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
-सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत
-अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांची उपस्थिती
इत्यादी किंवा यापेक्षा अधिक नियमावली पुन्हा येण्याची शक्यता आहे.