अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-पुणे जिल्ह्यात पुढच्या 7 दिवसांसाठी दिवसभर जमावबंदी तसंच संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केला आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुणे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या निर्बंधांनुसार शहरात नेमके काय सुरू राहणार आणि काय बंद होणारे पाहूयात.

file photo
लक्ष द्या; पुण्यात या गोष्टी सुरु राहणार :-
- सहानंतर फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी. इतर दुकाने बंद राहणार.
- हॉटेल, रेस्टॉरंटमधील पार्सल सेवा सुरू राहणार
- 10वी, 12वी आणि MPSCच्या परीक्षा नियोजित वेळेत होणार
- औद्योगिक कंपन्या सुरू राहणार
- लग्न सोहळ्यासाठी 50 जणांचा उपस्थित राहण्याची परवानगी
- अंत्यसंस्कारासाठी 20 जणांचा उपस्थित राहण्यास परवानगी
- दिवसा पाच पेक्षा कमी लोक एकत्र येऊ शकतात
लक्ष द्या; पुण्यात या गोष्टी बंद राहणार :-
- शाळा, महाविद्यालय 30 एप्रिलपर्यंत बंद असणार
- सर्व धार्मिक स्थळे, मॉल्स, थिअटर्स आठवडाभरासाठी बंद
- सात दिवसांसाठी हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद राहणार
- पीएमपीएल बससेवा आठवडाभर बंद
- राहणार सामाजिक, राजकीय कार्यक्रमावर बंदी
- आठवडे बाजारपेठ बंद राहणार
- रात्री बाहेर पडायला पूर्णपणे बंदी असणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|