अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे शनिवारी निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाची पाहणीसाठी आले होते. मात्र आता त्यांच्या या दौऱ्याचा खरा खुलासा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.
अधिकार्यांवर दबाव राहावा. कामे जलद व्हावीत. शेतकऱ्यांना लवकर पाणी मिळावे, असा त्यामागे उद्देश आहे. कोरोनामुळे गर्दी नको, यासाठी लोकप्रतिनिधींना निमंत्रण नव्हते.
कोणीही गैरसमज करू नये, असे तनपुरे यांनी सांगितले. रविवारी राहुरी कृषी विद्यापीठ येथे पत्रकार परिषदेत मंत्री तनपुरे बोलत होते. तनपुरे म्हणाले,
“महाविकास आघाडी सरकारने निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी प्राधान्य दिले आहे. निळवंडे उजव्या कालव्याच्या शेवटच्या टोकाकडील राहुरी तालुक्यातील गावे वंचित राहू नयेत.
कालव्याची कामे जलद गतीने करावीत. यासाठी जलसंपदा मंत्री पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करीत आहे. दरम्यान भाजपा सरकारच्या काळात निळवंडे कालव्यांची बांधकामे अवघी ९ टक्के झाली.
८१ टक्के बांधकामे शिल्लक होती. मागील दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने वेगाने कामे करून ४७ टक्के बांधकामे पूर्ण केली. १८ टक्के बांधकामे प्रगतीत आहेत. ३५ टक्के कामे शिल्लक आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम