अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- वादळी वारे व पावसामुळे नुकसान झालेल्या कणगर परिसरातील ग्रामस्थांना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंगळवारी सायंकाळी वैयक्तिक मदत देऊ केली.
अनेक घरांवरचे पञे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. ही माहिती मिळताच तनपुरे यांनी नुकसान झालेल्या ग्रामस्थांना घरांची दुरूस्ती करण्यासाठी तात्पुरती मदत दिली आहे.
मंगल किसन गाढे १० हजार, गणपत भिका घाडगे १० हजार, गेणू एकनाथ घाडगे १० हजार, सचिन नालकर ५ हजार, रघुनाथ घाडगे ५ हजार,
गोरक्षनाथ वरघुडे ५ हजार, रमेश गाढे ४ हजार, अर्जुन जाधव ३ हजार, अशोक जाधव ३ हजार, भिमराज जाधव ३ हजार अशी मदत देण्यात आली.
संसार उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी कणगरचे सरपंच सर्जेराव घाडगे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
एकीकडे कोरोनामुळे आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या असतानाच दुसरीकडे निर्सगाचा तडाखा बसल्याने ग्रामस्थांच्या हालात आणखी वाढ झाली.
नुकसान झालेल्या घरांची महसूल प्रशासनाकडून पाहणी व पंचनामे झाले असले, तरी नुकसान भरपाई देण्याबाबत दखल घेणे आवश्यक असल्याचे सरपंच धाडगे यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम