अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- सध्याच्या परिस्थितीत करोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार ही एक चांगली उपचार पद्धती आहे.
मात्र प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने ऑक्सिजन व रेमडीसीवर इंजक्शन प्रमाणे प्लाझ्माचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी प्लाझ्मा दाना बाबत जनजागृती अत्यावश्यक आहे.
करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जास्तीतजास्त नागरिकांनी न घाबरता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अॅड. अभिषेक भगत यांनी सुरु केलेल्या प्लाझ्मा दान मोहीमेच्या जनजागृतीसाठी पुढाकर घेतला आहे.
त्या अनुषंगाने नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची त्यांनी भेट घेवून प्लाझ्मा दान मोहिमेत सहभागी होण्याची विनंती केली. मंत्री तनपुरे म्हणाले, येणाऱ्या काळात कोरोनाचा अजून प्रादुर्भाव वाढण्यची शक्यता आहे.
त्यामुळे प्लाझ्मा दान मोहिम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या मोहिमेत सहभागी होत आहे. जिल्हा आरोग्यधिकारी व महानगरपालिका कडूनही करोनावर मात केलेल्या व्यक्तीची माहिती घेवून त्यांना वैय्यक्तिक संपर्क साधून प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|