मंत्री तनपुरे म्हणाले…विकास कामांच्या दर्जाबाबत तडजोड नाही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते नगर तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी तनपुरे म्हणाले कि, इथून मागे झाले ते झाले. यापुढे विकास कामांच्या दर्जाबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही.

विरोधकांवर टिका टिपण्णी करून राजकारण करण्याचे- दिवस गेले असून सध्या नागरिकांचे प्रश्न सोडवावेच लागतात, असे प्रतिपादन तनपुरे यांनी केले.

नगर-औरंगाबाद महामार्ग ते पिंपळगाव उज्जैनी रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अभियंत्यावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेला हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून सुमारे सहा ते सात महिन्यांतच रस्त्यावर मोठ खड्डे पडले आहेत.

वीजबिलाच्या मुद्द्यावर बोलताना तनपुरे म्हणाले कि, नविन वीज धोरणानुसार शेतकर्‍यांना 60ते 70 टक्के वीजबिलात सवलत देण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी योजनेचा फायदा घेऊन वीज बिल भरण्यास सहकार्य करावे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe