अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरीसह परिसरातील वाड्या वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 28 कोटींच्या ना. प्राजक्त तनपुरे यांच्या पाठपुराव्यातून साकार झालेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे.
या महत्वकांक्षी प्रकल्पबाबत प्रकल्प अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांची व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आले. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना मंत्री ना. तनपुरे म्हणाले, जल जीवन मिशन अभियाना अंतर्गत जिल्ह्यात सर्वात प्रथम वांबोरीच्या योजनेचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करण्याचे कामास सुरुवात केली आहे.
या योजनेवर प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून येत्या वर्षभरात सर्व मंजुरी होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती ना. तनपुरे यांनी दिली. या योजनेमुळे वांबोरीतील वाड्या-वस्त्यांवर तसेच संपूर्ण गावांमध्ये दररोज पाणी मिळेल.
राज्य व केंद्र सरकारचा निम्मा-निम्मा सहभाग असे मिळून 28 कोटी रुपयांची योजना असून यामध्ये पिण्याच्या पाण्याची टाकीसह मुळा धरणातून थेट लोखंडी पाईपद्वारे पाणी आणण्यात येणार आहे.
गावाअंतर्गत पाईपलाईन यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या योजनेची सर्व मंजुरी मिळवून येत्या वर्षभरात काम सुरू होईल, असा विश्वास ना.तनपुरे यांनी व्यक्त केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम