अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-महसूलमंत्री मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात १०० बेडसह उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजुरी मिळाली असल्याची माहिती साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली.
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयांमध्ये सध्या ३० अद्यावत बेडची व्यवस्था होती. मागील कोरोना संकटात यामध्ये तात्पुरती वाढ करण्यात आली. यासह ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही बसवण्यात आले.
पाच बायपप मशीन व राज्यातील पहिले आरटीपीसीआर मशिनही ग्रामीण रुग्णालयात बसविण्यात आले. या सुविधांमुळे कोरोना काळात तालुक्यातील व शेजारील तालुक्यांमधील नागरिकांनाही या रुग्णालयातून चांगली सुविधा मिळाली आहे.
संगमनेर तालुक्यातील वाढती लोकसंख्या, शहरातील चांगल्या वैद्यकीय सुविधामुळे इतर तालुक्यातील रुग्णांची ही वाढती संख्या व नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी मंत्री थोरात यांनी महाराष्ट्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून संगमनेरमध्ये अद्यावत उपजिल्हा रुग्णालय मंजूर व्हावे यासाठी पाठपुरावा केला.
उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याने संगमनेर तालुक्यातील नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम