अल्पवयीन तरुणीचे दोघांनी केले अपहरण!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नेवासा तालूक्यातील दोन तरूणांनी राहुरी तालुक्यातील केंदळ परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालूक्यातील उंबरे परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटूंबासह राहत आहे. दिनांक १० मार्च रोजी सकाळी राहुरी तालूक्यातील केंदळ येथून त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले.

अपहरण करणारे हे नेवासा तालूक्यातील आहेत. त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी एका आरोपीला फोन केला. तेव्हा तो म्हणाला कि, तूला काय करायचे ते कर. मी घाबरत नाही.

असे म्हणून त्याने मुलीच्या वडिलांना शिवीगाळ केली. आरोपींनी अज्ञात कारणासाठी आपल्या मुलीचे अपहरण केले. याची खात्री झाल्यानंतर त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विशाल भाउसाहेब काकडे व रितेश भाउसाहेब काकडे दोघे राहणार सोनई, ता. नेवासा या दोघांवर अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महादेव शिंदे हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe