अल्पवयीन मुलीस पळवले!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्याची घटना खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथे घडलीआहे.

याप्रकरणी शुभम भाऊसाहेब शेळके या तरूणाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नान्नजदुमाला येथून शुभम याने एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले.

दरम्यान संबंधित मुलीचा शोध घेवूनही मुलगी न सापडल्याने सदर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली.

त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात शुभम शेळके याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान नान्नजदुमाला येथून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्याच्या घटनेने पंचक्रोशीत चांगलीच खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe