अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला होता. आता दुसरी लाट काहीशी ओसरली असल्याचे दिसून आले आहे.
मात्र दोन लाटांत झालेल्या चुका आता संभाव्य तिसऱ्या लाटेत होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक आहे. दरम्यान याच पार्शवभूमीवर श्रीगोंदा तालुक्यात प्रशासनाचे नियोजन सुरु आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या माहितीचा अभाव असतानाही अधिकाऱ्यांनी चांगले काम केले. अर्थात, त्यांना लोकांचीही साथ मिळाल्याने ती लाट भीतीच्या वातावरणात ओसरली.
तहसीलदार महेंद्र माळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी चांगले नियोजन केल्याचा फायदा नक्कीच झाला. नंतरच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांची बेजबाबदारी प्रशासनाला महाग पडली.
यातच तालुक्याची जबाबदारी नवख्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असल्याने परिस्थिती हाताळण्यात ते फारशी समाधानकारक कामगिरी बजावू शकले नाही.
मात्र आता प्रशासनाने मागील चुका तालात योग्य नियोजन केल्यास संभाव्य तिसरी लाट हाताळणे सहज शक्य होऊ शकते.
तिसऱ्या लाटेसाठी उपाययोजना काय करता येतील?:- पहिल्या दोन्ही लाटेतील झालेल्या चुका टाळाव्यात, ज्या गावांनी कोरोना रोखला, तेथील गावकारभाऱ्यांशी चर्चा करावी लागेल.
लसीकरणात सुसूत्रता आणतानाच प्रामाणिकपणा दाखवावा लागेल. खासगी डॉक्टरांना विश्वासात घेऊन त्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल.
काही खासगी डॉक्टरांच्या अनुभवाचा उपयोगही करून घ्यावा लागेल. गावपातळीवर खरी, वस्तुनिष्ठ माहिती देणारे व प्रत्यक्ष काम करणारे वॉरियर्स उभे करावे लागतील.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम