साई संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची निवड व्हावी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  शिर्डी संस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळवून या पदावर आमदार डॉ. सुधीर तांबे यांची निवड व्हावी, अशी एकमुखी मागणी राहाता तालुका काँग्रेसने केली आहे.

खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सरचिटणीस प्रियंका सानाप, युवकचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गोंदकर,

जिल्हा सरचिटणीस श्रीकांत मापारी यांच्या उपस्थितीत तालुका कार्यकारिणीची बैठक तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या राहाता कार्यालयात झाली.

शिर्डी संस्थानचा अध्यक्ष काँग्रेसचा करुन अध्यक्षपद नाशिक पदवीधरचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांना द्यावे, असा ठराव बैठकीत करण्यात आला.

सानाप यांनी बैठकीचा ठराव पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना देणार असल्याची माहिती दिली. स्मितल वाबळे, सुभाष सांगळे, श्रीकांत मापारी,

बाळासाहेब खर्डे, सचिन चौगुले, सुरेश आरणे, रावसाहेब बोठे आदींची यावेळी भाषणे झाली. भास्कर फणसे, रमेश गागरे, उमेश शेजवळ, पंकज लोंढे, राजेंद्र निर्मळ, सचिन गाडेकर, नितीन सदाफळ, आमृत गायके,

सार्थक करमसे, सुभाष निर्मळ, मुन्ना फिटर, अरुण जाधव, अभिषेक वाघमारे, मदन मोकाटे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र निर्मळ यांनी उपस्थितांचे आभार मानले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe