अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असतानाच अवजड वाहतूक नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली, अपघात वाढत गेलेले आहे
असल्याने संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यातून आज शंकर चौकांमध्ये रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी अवजड वाहतुकीचा विषय बैठकीमध्ये मांडला एवढे होऊन देखील प्रशासनाला गांभीर्य नसेल तर काय उपयोग तुम्ही अजून किती जणांचे जीव घेणार आहात असा सवालही त्यांनी यावेळी प्रशासनावर विचारला.
अवजड वाहतूकीमुळे दोन नागरिकांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व पोलीस प्रशासन यांच्याशी बैठक घेऊन अवजड वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी संबंधित उड्डाणपुलाच्या कामाच्या ठेकेदारास व पोलीस प्रशासनास दिल्ली गेट व कोठी रस्त्यावरून जाणारी अवजड वाहतूक बंद करावी, असे आदेश दिले होते.
तरीही राजरोसपणे दिल्ली गेट व उड्डाणपुलाचे काम सुरू असलेला रस्ता यावरून अवजड वाहतूक होत आहे. यावर आ. जगताप यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने बॅरिगेट्स लावण्यात आली, उड्डाणपुलाच्या ठेकेदाराकडून कामावरती वॉचमेनची संख्या वाढवण्यात आली.
तसेच उड्डाणपुलाच्या महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्याच्या व दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. संबंधितांवर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जातील, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने आ. जगताप यांना देण्यात आले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम