नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जाऊ नये यासाठी आमदार काळेंनी दिल्या सूचना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-हिवाळा गेला असून आता उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळा सुरु होत असूनभविष्यात नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही

याची काळजी घेवून ग्रामपंचायत पदाधिकारी व पंचायत प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहे.

आ. आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीच्या सर्व विभागाची आढावा बैठक पार पडली.यावेळी बोलताना काळे म्हणाले की, उन्हाळा सुरु होत आहे. पंचायत समिती प्रशासनाने सतर्क राहावे. सध्या करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

मागील वर्षी करोनाचे रुग्ण वाढत असतांना ग्रामीण भागात ज्या उपाययोजना केल्या त्या उपाययोजना आवश्यक त्या ठिकाणी राबवा.

जनतेचे सेवक या नात्याने ती आपली जबाबदारी असून त्यातूनच खर्‍या अर्थाने लोकहित साधले जाणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

14 व्या वित्त आयोगातील शिल्लक राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करा. 15 व्या वित्त आयोगाच्या मिळणार्‍या निधीतून नागरिकांना अपेक्षित असलेली व नागरिकांच्या गरजेची कामे ओळखून कामे प्रस्तावित करा. 15 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करतांना काळजी घेवून कामाची गुणवत्ता चांगली राहील याची काळजी घ्यावी

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe