अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके हे सध्या जिल्ह्यासह राज्यात गाजत आहे. आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या 1 हजार 100 बेडच्या भव्य कोविड सेंटरला परदेशातून मदतीचा हातभार लाभतो आहे.
लंके यांनी भाळवणीमध्ये कोविड सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये एकूण अकराशे बेड असून शंभर ऑक्सिजन बेडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. भाळवणी (ता. पारनेर) येथील या कोविड सेंटरमध्ये निलेश लंके स्वतः रुग्णांची सेवा करत असून त्यांच्या या कार्याची दाखल जगभरात घेतली जात आहे.
त्यांच्या कार्याची दाखल म्हणून आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली आहे. इतकेच नाही तर काही परदेशी नागरिकांनी देखील निलेश लंके प्रतिष्ठानच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत.
केवळ परदेशातून 1 कोटी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत निलेश लंके यांना मिळाली आहे. कोरोनाच्या काळात आपण लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांची सेवा करत असून केवळ रुग्ण बरे व्हावे हा एकमेव उद्देश असल्याची प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली.
सर्व सोयीसुविधासह उपलब्ध कोविड सेंटर…. :- या सेंटरमध्ये रूग्णांसाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टिमर, नॅपकिन, पाणी बाॅटली, साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जात आहे. २४ तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी, वापरण्यासाठी गरम पाणी.
रुग्णांच्या आरोग्यासाठी सकस जेवण, दूध, अंडी, सूप, ड्रायफ्रूट्स असा आहार दिला जात आहे. दरम्यान, त्यांच्या या सेंटरला परदेशातून आर्थिक मदत मिळत आहे. तब्बल १ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक मदत परदेशातून मिळाल्याची माहिती समोर येत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|