अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- पाथर्डी शेवगाव मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये आमदार मोनिका राजळे यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन शेवगाव- पाथर्डी मतदार संघातील विकास कामांसाठी निधीची मागणी करून मतदार संघात केंद्र शासनाच्या विविध योजना राबविणे बाबत चर्चा केली.
यावेळी नवनियुक्त मंत्र्यांचे अभिनंदन करून मतदार संघातील गावांचा विविध योजनेमध्ये समावेश करण्याबाबत सबंधित खात्याच्या मंत्र्यांना निवेदन देऊन आग्रही मागणी केली.
यामध्ये प्रामुख्याने मतदारसंघातील राज्यमार्ग, महामार्ग व केंद्रीय रस्ते अनुदानातून विविध रस्त्यांची सुधारणा व नवीन रस्त्याची मागणी केली.
आ. राजळे यांचा तीन दिवसाचा दिल्ली दौरा अत्यंत यशस्वी झाला असून गेल्या दोन वर्षापासुन राज्यातील महाविकास आघाडी सरकार आ.राजळे यांना विरोधी पक्षाचे आमदार म्हणुन
पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातील विकास कामांना निधी देतांना टाळाटाळ करत असल्याने त्यावर मात करत दिल्ली दौरा करून केंद्र सरकारच्या माध्यमातुन मतदारसंघाच्या विकास कामासाठी मोठा निधी मिळण्यासाठी प्रयत्न करत असल्याने आ. राजळे यांच्या दिल्ली दौर्याबद्दल पाथर्डी शेवगाव तालुक्यातील जनतेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम