कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार नीलेश लंके यांनी केले ‘हे’ आवाहन !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:ची काळज़ी घ्यावी, असे आवाहन आमदार नीलेश लंके यांनी केले. आरोग्य सेवा आपल्या दारी,

या उपक्रमांतर्गत कॅरियर, माय आयडिया कंपनी व स्नेहालय संस्थेच्या वतीने हंगा येथे आयोज़ित मोफत सर्वरोग तपासणी शिबिराप्रसंगी आ. लंके बोलत होते.

समुदाय अरोग्यवर्धिनी उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणीत बी. पी. शूगर, आम्लापित्त, पोटाचे विकार, संधीवात, यावर मोफत औपधोषचार करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन हंगा गावचे सरपंच बाळासाहेब दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात २५० नागरिकांनी सहभाग नोंदवत तपासणी करून औषधोपच्चार घेतले.

हंगा ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या या शिबिरास उपस्थित डॉक्टर्स व त्यांच्या सर्व टीमचे उपसरपंच सौ. वनिता शिंदे यांनी आभार मानले.

या वेळी जगाधिश साठे, राजेंद्र दळवी, रुपाली दळवी, सविता नगरे, मेघा नगरे, सुलोचना लोंढे, राजेंद्र शिंदे, नीता रासकर, माया साळवे यांच्यासह दीपक लंके, चंद्रकांत मोढवे, सुहास नगरे, बाळासाहेब शिंदे, सोपान दळवी, अशोक नगरे, रमेश ठोंबरे यांच्यासह ग्रामस्थ,नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News