अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-सचिन वराळ यांचा आदर्श घेऊन युवा सहकाऱ्यांनी गावोगावी कोविड उपचार केंद्र सुरू केले आणि रुग्णांना तात्काळ उपचार मिळाले तर करोना संसर्गावर लवकर मात करणे शक्य होईल असा विश्वास आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला.
संदीप पाटील वराळ फाऊंडेशनच्या पुढाकारातून निघोज परिसरातील जगप्रसिद्ध रांजगणखळगे परिसरात कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.
केद्रांचे उदघाटन आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले. वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या या सुसज्ज उपचार केंद्राचे कौतुक करन सचिन वराळ, सरपंच चित्रा वराळ, उपसरपंच माऊली वरखडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना आमदार लंके यांनी धन्यवाद दिले.
यावेळी आमदार लंके म्हणाले की,सचिन वराळ व त्यांचे सहकारी उपचार केंद्रात योग्य नियोजन करून ते यशस्वीरीत्या चालवितील यात शंका नाही.
गावागावांमधील युवा सहकाऱ्यांनी वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांचा आदर्श घ्यायला हवा.उपचार केंद्राच्या उदघाटनापूर्वीच येथे रूग्ण दाखल झाले आहेत.
चांगल्या रूग्णालयाप्रमाणे येथे सुविधा देण्यात आल्या आहेत ही समाधानाची बाब आहे.करोना महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले असून सर्वसामान्य नागरीक त्यात होरपळले जात आहेत.
आम्ही आमच्या परीने रूग्णांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोेत. माता मळगंगेने जनतेवर आलेले हे संकट लवकरात लवकर दूर करावे, असे साकडेही आमदार लंके यांनी यावेळी निघोजचे ग्रामदैवत माता मळगंगेला घातले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|